मुंबई

पर्यावरणपूरक होळीचा संकल्प

CD

पर्यावरणपूरक होळीचा संकल्प
उत्तन येथे निर्माल्यापासून नैसर्गिक रंगांची निर्मिती
भाईंदर, ता. २६ (बातमीदार) : होळीनिमित्त वापरल्या जाणाऱ्या रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे. याच अनुषंगाने उत्तन येथील केशवसृष्टी, माय ग्रीन सोसायटी यांनी निर्माल्यापासून नैसर्गिक रंग तयार केले आहेत.
होळीनिमित्त खेळला जाणारा धुळवड रंगांचा उत्सव आहे; मात्र उत्सव साजरा करताना अनेकदा रासायनिक रंगांचा वापर केला जातो. हे रंग त्वचेसाठी घातक ठरू शकतात. यासाठी केशवसृष्टीने ‘फुलिका’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत मिरा-भाईंदर शहरात उत्सव तसेच मंदिरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे संकलन करून प्रक्रिया करून खत, उदबत्त्या, धूप तयार केले जात आहे. तसेच होळीनिमित्त नैसर्गिक, सुगंधी, सुरक्षित रंग तयार करण्यात आले असून रंग रसायनमुक्त, त्वचेस सुरक्षित, पर्यावरणपूरक, नैसर्गिक घटकांपासून बनवलेले आहेत.
----------------------------
कचरा निर्मूलनात मदत
या उपक्रमामुळे निर्माल्य कचऱ्यात जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होत आहे. शिवाय, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व सामाजिक सहभाग यांचा सुंदर संगम घडताना लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत रंग सुरक्षित असल्याचा दावा संस्थेने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधी सोनं महागलं! चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Temple Tourism: पांडवांनी स्थापन केलेले मंदिर आता जगभरात गाजणार! सरकारकडून १ कोटींचा निधी मंजूर; स्वयंभू शिवलिंगाचे रहस्य काय?

Global Conflict: युद्धाचा तिढा कायम- पण निष्फळ वाटाघाटी पुन्हा सुरू?

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

SCROLL FOR NEXT