मुंबई

मजगावात श्री विठ्ठल रखुमाई व संत गोरोबाकाका मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा

CD

मजगावात श्री विठ्ठल रखुमाई व संत गोरोबाकाका मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
समाजबांधवांच्या स्व-वर्गणीतून जीर्णोद्धार; कीर्तन, महापूजा व भजनांनी तीन दिवसीय सोहळ्याची सांगत
मुरूड, ता. २६ (बातमीदार) : मुरुड तालुक्यातील मजगाव येथे श्री विठ्ठल रखुमाई व संत शिरोमणी गोरोबाकाका मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. कुंभार समाजाने सुमारे ५० वर्षांपूर्वी उभारलेले हे मंदिर जीर्ण झाल्याने समाजबांधवांनी कोणत्याही राजकीय किंवा धनिकांच्या मदतीशिवाय स्व-वर्गणीतून त्याचा जीर्णोद्धार केला.
प्राणप्रतिष्ठेनिमित्त मिरवणूक, ह.भ.प. मारतीबुवा कोल्हाटकर यांचे कीर्तन, श्री सत्यनारायण महापूजा, महिलांचा हळदीकुंकू, माहेरवाशिणींचा सत्कार तसेच डबलबार भजनांचा जंगी सामना असे कार्यक्रम पार पडले. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दर्शन घेत समाजाचे अभिनंदन केले.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य ज्योती नागावकर व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सोहळा यशस्वी करण्यासाठी मंगेश बिरवाडकर, विजय घोसाळकर, निलेश बिरवाडकर व समाजातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT