मुंबई

नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणांना गंडा

CD

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : मर्चंट नेव्ही आणि शिपिंग क्षेत्रात नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवून एका पिता-पुत्राने अनेक सुशिक्षित तरुणांकडून २० लाख ४० हजार रुपये उकळून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वैभव संजय सिंह (वय ३२) आणि संजय सिंह (वय ६४) या दोघांविरोधात सीबीडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

संशयित आरोपी पिता-पुत्राने सहा महिन्यांपूर्वी सीबीडी सेक्टर-११ मधील रहेजा आर्केड या इमारतीत एसएसएस नॉटिकल मरीन या नावाने कार्यालय उघडले होते. त्यानंतर त्यांनी मर्चंट नेव्ही आणि शिपिंग क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांची माहिती मिळवून त्यांना संपर्क साधला. तसेच त्यांना परदेशात जहाजावर नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवले. अनेक सुशिक्षित तरुणांनी या कंपनीत लाखो रुपये जमा केले. त्यापैकीच एक असलेला दिवा येथील रहिवासी नहुश नामदेव नेऊग्रे (वय २३) याने नोकरीसाठी एक लाख रुपये दिले. त्यानंतर तो नोकरीबाबत विचारणा करण्यासाठी सीबीडी येथील कार्यालयामध्ये जाऊ लागल्यानंतर, दोघांनीही त्याच्याप्रमाणेच ईश्वरसिंह कथायत (रा. उत्तराखंड) याच्याकडून साडेसात लाख, संदीप चव्हाण (रा. दिघा, नवी मुंबई) याच्याकडून ६९ हजार, मोहम्मद कफील अन्सारी (रा. मुंब्रा) याच्याकडून ७० हजार, तसेच दानिश शफीक खान (रा. उत्तर प्रदेश) याच्याकडून ५० हजार रुपये घेतल्याचे लक्षात आले.

नोकरीही नाही आणि पैसेही मिळत नसल्याने या तरुणांनी तगादा लावल्यानंतर, संजय सिंह याने गावाकडची जमीन विकून सर्वांचे पैसे परत करण्याचे आश्वासन देत मुद्रांक शुल्कावर सत्यप्रतिज्ञापत्र लिहून दिले; मात्र त्यानंतर या बाप-लेकाने कार्यालयाला टाळे लावून पलायन केले.

कार्यालयातून तरुणाकडूनही उसनवार
विशेष म्हणजे, या पिता-पुत्रांनी त्यांनी कार्यालयात कामाला ठेलेल्या शुभम दरेकर या तरुणाकडून १० लाख रुपये उसनवार घेतले होते. पोलिसांनी पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. दोघेही मूळचे मेरठ (उत्तर प्रदेश) येथील असून सध्या ते उलवे येथे राहत होते. त्यांनी आणखी किती तरुणांची फसवणूक केली, याचा तपास सीबीडी पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

बिग बॉसची स्पर्धक तन्वी कोलतेला मोठा धक्का, इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब!

Company Bonus Video: पैसेच पैसे! टेबलावर ठेवले २४० कोटी अन् म्हणाला मोजता येतील, तेवढे उचला

T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली

SCROLL FOR NEXT