मुंबई

बोर्लीपंचतन येथे बालरुग्ण सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांचे आरोग्य शिबिर

CD

बोर्लीपंचतन येथे बालरुग्ण सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांचे आरोग्य शिबिर
श्रीवर्धन, ता. २५ (वार्ताहर) : डॉ. राजेश पाचारकर मित्र फाउंडेशनतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र, बोर्लीपंचतन येथे बालरुग्णांसाठी सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांचे आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले. नवी मुंबई व ठाणे येथील बाल शल्यचिकित्सक, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, मेंदू व मज्जासंस्था तज्ज्ञ, भाषण चिकित्सक तसेच पुनर्वसन तज्ज्ञांनी या शिबिरात सहभाग घेतला.
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील बालकांची तपासणी करून आजारांचे निदान करण्यात आले. ज्या बालकांना पुढील उपचारांची आवश्यकता आहे, त्यांच्यावर नवी मुंबई येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. शिबिरासाठी सह्याद्री महिला ग्रामसंघ, आशा आरोग्य सेविका तसेच ठाणे येथील जहरा हसनत चॅरिटेबल ट्रस्ट यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मार्च २०१८ पासून परिसरात विविध सामाजिक व आरोग्य उपक्रम राबविणारे डॉ. राजेश पाचारकर यांनी सर्वांचे आभार मानले. मार्च २०२६ पासून दरमहा पाच गरजू नेत्ररुग्णांना मोफत चष्मे देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिबिराला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नारायणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT