मुंबई

एअरटेल मनीची एनबीएफसीत कोट्यवधींची गुंतवणूक

CD

एअरटेल मनीची एनबीएफसीत कोट्यवधींची गुंतवणूक

मुंबई, ता. २६ : भारती एअरटेलने त्यांची ‘बिगर-बँक’ वित्तसंस्था एअरटेल मनीमध्ये २० हजार कोटी रुपये गुंतवण्याची घोषणा केली आहे. भारतात सहजपणे कर्जपुरवठा व्हावा यासाठी हे प्रयत्न आहेत.
एअरटेलची उपकंपनी असलेली ही बिगर-बँक वित्तसंस्था पुढील काही वर्षांत वीस हजार कोटी रुपयांच्या भांडवलीकरणासह विकसित होईल. बळकट डिजिटल मालमत्ता, पाचशेहून अधिक डेटा शास्त्रज्ञांचे पाठबळ असलेले मोठे डेटा आणि विश्लेषण इंजिन व सखोल ऑपरेशनल कौशल्यांसह ही संस्था संपूर्ण भारतात सुलभ, सुरक्षित आणि नाविन्यपूर्ण डिजिटल वित्तीय सेवा देणार आहे. एअरटेलने गेल्या दोन वर्षांत त्यांच्या डिजिटल व्यासपीठाचा वापर करून, उच्च-कार्यक्षमता असलेले क्रेडिट इंजिन तयार केले आहे. परिणामी ते भारतातील सर्वात बळकट कर्जसेवा प्रदात्या मॉडेलपैकी एक बनले आहे, असे भारती एअरटेलचे कार्यकारी उपाध्यक्ष गोपाल विठ्ठल म्हणाले.
‘एअरटेल मनी’ला यावर्षी १३ फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेकडून एनबीएफसी परवाना मिळाला आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या वित्तीय सेवा क्षेत्रात एअरटेलच्या या धोरणात्मक विस्तारामुळे एअरटेलची अर्थक्षेत्रातील व्याप्ती वाढून अर्थसेवेपासून वंचित असलेल्या ग्राहकांना सक्षम केले जाईल. केअर एज रेटिंग्जनुसार, भारताचे औपचारिक कर्जाचे जीडीपीशी प्रमाण हे ५३ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : पुढच्या वेळी आदित्य ठाकरेंना दावोसला नेतो - फडणवीस

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT