पेण शहरातील अतिक्रमण हटवायला नगरपालिकेची सुरुवात
पेण, ता. २६ (वार्ताहर) : शहरात गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने नागरिकांना सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने शहरातील वाढते अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पेण शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या आणि औद्योगीकरण वाढत असताना अनेक भागांना अतिक्रमणाने विळखा घातला आहे. मुख्य रस्त्यांसह जागोजागी अनधिकृत टपऱ्या आणि छोटी-मोठी दुकाने यांचा थाटल्याने येथील स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आमदार रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी ५० कोटी निधी उपलब्ध झाला असून काम सुरु आहे. या कामाला अडथळा येऊ नये यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे शहराच्या अंतोरा रोडवरील नरदास चाळ येथील अतिक्रमण हटविले आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यकरणात नक्कीच भर पाडणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
पेण शहर स्वच्छ आणि सुंदर आहे. येथील वाढलेले अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपालिका प्रशासन आता सज्ज झाली आहे. एकीकडे शहरात रस्ता काँक्रीटीकरणाची कामे सुरू असून त्याला अडथळा होऊ नये म्हणून नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमणे येत्या काही दिवसात काढली जाणार आहेत.
- सुहास कांबळे, अधिकारी नगर रचनाकार, पेण नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.