मुंबई

मुस्लिम आरक्षणासाठी मुंब्रात आंदोलन

CD

मुस्लिम आरक्षणासाठी मुंब्र्यात आंदोलन
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निदर्शन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ ः २०१४ मध्ये मुस्लिमांना दिलेले पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्या निषेधार्थ मुंब्रा येथे विरोधी पक्षनेते शानू पठाण आणि नगरसेविका मर्जिया पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी शानू पठाण यांनी मुस्लिमांना आरक्षण न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू केली होती; पण आता राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित केला आहे. आरक्षणाचा शासन आदेश आणि परिपत्रक जारी केले असून, त्यात आरक्षण रद्द केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्या निषेधार्थ गुरुवारी (ता. २६) दुपारी नमाज अदा केल्यानंतर दारूल फलाह मशीद येथे हे आंदोलन करण्यात आले.

मुस्लिम समाज शैक्षणिकदृष्ट्या अद्यापही मागास आहे. तसेच, शासकीय नोकऱ्यांमध्येही मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळत नाही. ते मिळावे यासाठी हे आरक्षण दिले होते; मात्र आता हे आरक्षण रद्द करून मुस्लिमांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप या वेळी आंदोलकांनी केला. याप्रसंगी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, मुस्लीम आरक्षण मिळालेच पाहिजे, महायुती सरकार हाय हाय, असे संदेश दिलेले फलक घेतले होते.
मर्जिया पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की सच्चर आयोगाची अंमलबजावणी करताना सामाजिक, आर्थिक मागास असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची गरज असल्याचे म्हटले आहे.

मुस्लिम समाजावर अन्याय
संविधानातही मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता व्यक्त केली आहे. आरक्षण हा अधिकार आहे. तोच काढून घेण्यासाठी फक्त मुंबईतील आलेख तपासला जात आहे; पण हे सरकार फक्त मुंबईसाठी निवडून आलेले नाही. ते सबंध राज्याचे आहे ना? मग, गोरगरीब मुस्लिम समाजावर अन्याय का केला जात आहे, संविधानाने शोषीत, पीडित वर्गाला त्यांचा दर्जा उंचावण्याचा अधिकार दिला आहे. याची जाणीव ठेवून नवीन वटहुकूम काढून चालू अधिवेशनातच मुस्लिम आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरच्या नगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात; ४ ते ५ जण गंभीर जखमी

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT