मुंबई

ठाणे महानगरपालिका भरती रखडली

CD

ठाणे महानगरपालिका भरती रखडली
७५ हजार उमेदवारांचे भवितव्य टांगणीला, मनसे आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : पालिकेतील क आणि ड संवर्गातील एक हजार ७७३ पदांसाठी जाहीर करण्यात आलेली भरती प्रक्रिया सहा महिन्यांहून अधिक काळ लांबणीवर पडल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक झाली असून शहरप्रमुख रवी मोरे यांनी आयुक्त सौरभ राव यांना निवेदन देत जाब विचारला आहे.
वाढती लोकसंख्या आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता महापालिकेच्या कामकाजावर ताण वाढला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ लाखांहून अधिक होती; सध्या ती २५ लाखांच्या आसपास पोहोचल्याचा अंदाज आहे. राज्य शासनाने मंजूर केलेली ८८० वाढीव पदेही अद्याप भरली गेलेली नाहीत. अशातच, महापालिका प्रशासनाने सप्टेंबर २०२५ मध्ये आरोग्य, अग्निशमन आणि इतर महत्त्वाच्या विभागांतील रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली होती. या भरतीसाठी सुमारे ७५ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून प्रत्येक अर्जदाराकडून अंदाजे १,८०० रुपये शुल्क आकारण्यात आले. मात्र, फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत परीक्षा, निवड प्रक्रिया किंवा पुढील टप्प्यांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आरोग्य आणि अग्निशमन विभागावर ताण
महापालिकेतील रिक्त पदांची संख्या मोठी आहे. आरोग्य विभागात मंजूर ८३५ पदांपैकी ६२६ पदे रिक्त आहेत. परिचारिका, प्रसाविका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, दवाखाना आया, लिपीक अशा एकूण ६५ प्रकारच्या पदांसाठी भरती होणार आहे. अग्निशमन विभागातही अनेक पदे रिक्त असून चालक आणि फायरमन पदांच्या भरतीला महत्त्व आहे.

पुढील टप्पे लवकरच
दरम्यान, ठाणे महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया पुढे नेता आली नाही. आता प्राप्त अर्जांची छाननी करून पुढील टप्पे लवकरच सुरू केले जातील, अशी माहिती मुख्यालयाचे उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी दिली. भरती प्रक्रियेतील या विलंबामुळे हजारो बेरोजगार उमेदवार संभ्रमात असून महापालिकेने तातडीने स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही मनसेने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT