मनोरुग्णालय वृक्षतोड प्रकरण
शरद पवार अवमानना याचिका दाखल करणार
लवकरच संयुक्त पाहणी दौरा आयोजित करणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील ४२४ झाडांची कत्तल करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. त्याविरोधात शरद पवार पक्षाने आंदोलनही केले होते. वागळे इस्टेट पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्याची सूचना ठाणे पालिकेला केलेली आहे. मात्र, याबाबत कोणतीच कारवाई झालेली नसल्याने याप्रकरणी अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिला आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील ४२४ झाडे तोडण्यात येणार असून ही वृक्षतोड रोखण्याची विनंती ८ डिसेंबर २०२५ रोजी मनोज प्रधान यांनी केली होती. मात्र, अद्यापही कारवाई करण्यात न आल्याने मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने उपायुक्त बोडके यांची भेट घेऊन पालिकेविरोधात अवमानना याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. याप्रसंगी महिलाध्यक्ष मनिषा भगत, नगरसेवक यासीन कुरेशी, नगरसेवक अभिजीत पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम आदी उपस्थित होते.
मनोज प्रधान यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडे तोडताना महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ या कायद्याचा भंग झाला आहे. तसेच, या परिसरात घार, पोपट, साळुंखी आदी पशूपक्ष्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ आणि भारतीय वन कायदा, १९२७ हा कायद्याचाही भंग झाला असून या संदर्भातील गुन्हा अजामीनपात्र आहे. या तिन्ही कायद्यांचा भंग तथा अवमान करून सार्वजनिक बांधकाम खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृक्ष कत्तल केली असून ठाणे पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांनीही या वृक्ष कत्तलीस प्रोत्साहन दिले आहे. याप्रकरणी पालिकेने गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार द्यावी, अशी विनंतीही केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे मनोज प्रधान यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.