मुंबई

नाशिकची परवानगी, ठाण्यात बेकायदेशीर आयव्हीएफ; स्त्रीबीज तस्करीचं काळं रॅकेट उघड!

CD

नाशिकच्या परवानगीने ठाण्यात बेकायदेशीर आयव्हीएफ
महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर हालचालींना वेग

बदलापूर, ता. २६ (बातमीदार) ः बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात मोठा धक्कादायक खुलासा झाला असून, नाशिक येथील परवानगी असलेले मालती आयव्हीएफ सेंटर हे ठाणे येथे बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे. याच सेंटरच्या माध्यमातून स्त्रीबीज तस्करीचे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी गुरुवारी बदलापूर येथे (ता. २६) दिली. नाशिकमध्ये वैध परवानगी असतानाही ठाण्यात नियमबाह्यरीत्या सेंटर चालवून त्याआड गैरकृत्ये केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या खुलाशामुळे आरोग्य विभाग आणि महिला सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
ठाणे पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती देऊन तातडीची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. बदलापूर प्रकरणानंतर आज महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभागातील अधिकारी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तपासाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत आयव्हीएफ प्रक्रियेतील नियमभंग, परवानग्यांचा गैरवापर आणि रॅकेटचे आंतरजिल्हा स्वरूप यावर सखोल चर्चा करण्यात आली.

सुरुवातीला अटक झालेल्या महिला आरोपी आरोग्य क्षेत्राशी संबंधित नसतानाही स्त्रीबीज रोपणासारख्या वैद्यकीय प्रक्रियेत सहभागी होत्या. या सर्वांची दलाल म्हणून सोनल गरेवाल काम करत होती. महिलांची ओळख वारंवार बदलणे, आधार कार्डसह बनावट कागदपत्रे तयार करणे आणि राज्यात तसेच देशात विविध आयव्हीएफ सेंटरमध्ये प्रवास करून हे काम करणे, असा संगनमताचा पॅटर्न उघड झाला आहे. याशिवाय, अटक करण्यात आलेला पाचवा आरोपी सुमीत सोनकांबळे हा संपूर्ण प्रक्रियेचे नियोजन आणि समन्वय साधत असल्याची माहिती देण्यात आली. या रॅकेटची मुळे बदलापूरपासून इतर राज्यांपर्यंत पसरल्याचे संकेत असून, तपास अधिक व्यापक करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांच्याकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: हार्दिक पांड्याचे सलाम-ए-इश्क! दोन षटकार.. शेवटच्या चेंडूवर फिफ्टी.. माहिका शर्माला फ्लाइंग Kisssss Video Viral

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

SCROLL FOR NEXT