मुंबई

बदलापुरात पुन्हा बिबट्याचा थरार; दोन महिलांवर हल्ला, मोठ्या धैर्याने जीव वाचवला!

CD

बदलापुरात पुन्हा बिबट्याचा थरार
दोन महिलांवर हल्ला; वनविभागाकडे शोधमोहिमेची मागणी

बदलापूर, ता. २६ (बातमीदार)ः बदलापूर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. जांभीळघर येथे राहणाऱ्या शोभा गायकवाड व अनिता गायकवाड या दोन्ही महिला बुधवारी (ता. २५) शेतावर लाकडाचे भारे बांधण्यासाठी गेल्या असताना सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने हल्ला केला. या प्रकरणात महिला किरकोळ जखमी झाल्या असून बिबट्याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
लाकडाचे भारे बांधताना वाकलेल्या अनिता गायकवाड यांच्यावर मागून बिबट्याने झडप घातली. सुरुवातीला कुत्रा अंगावर धावून आला, असे वाटल्याने त्यांनी त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला; मात्र पकड घट्ट होताच हा बिबट्याचा हल्ला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रसंगावधान राखत अनिता गायकवाड यांनी हातातील कोयता मागील दिशेने फिरवत स्वतःचा बचाव केला. त्यामुळे घाबरलेला बिबट्या जवळील पाण्याच्या ओढ्याकडे पळाला.
ओढ्यात पाणी पिऊन पुन्हा एकदा दोन्ही महिलांवर झडप घालण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला शोभा गायकवाड व अनिता गायकवाड यांनी मोठ्या हिमतीने दगडफेक करून परतवून लावले. अखेर घाबरून बिबट्याने तिथून पळ काढला. या झटापटीत अनिता गायकवाड यांच्या डाव्या हातावर बिबट्याच्या नखांची किरकोळ जखम झाली असून दाताने चावा घेण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत दोन्ही महिला लाकडाचे भारे उचलून घरी धावल्या. प्रकाराची माहिती गावात समजताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा शोध घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बदलापूरच्या ग्रामीण हद्दीत पुन्हा बिबट्याचा वावर आढळल्याने जांभीळघर व परिसरातील अनेक गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

Parth Pawar to Join Rajya Sabha: पार्थ पवार राज्यसभेवर जाणार! राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनकडून पुन्हा अपेक्षाभंग! बाद होताच सन्नाटा, डग आऊटमध्ये गौतम गंभीरने काय केले ते वाचा? सारेच चक्रावले

India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

SCROLL FOR NEXT