पुराव्यांअभावी संजय राऊतांची निर्दोष सुटका
मेधा सोमय्यांची बदनामी प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : भाजप माजी खासदार किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची पुराव्यांअभावी गुरुवारी (ता. २६) सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
सोमय्यांच्या बदनामीच्या तक्रारीची दखल घेऊन महानगर दंडाधिकाऱ्यांनी राऊत यांना दोषी ठरवताना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला स्थगिती देऊन न्यायालयाने राऊतांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर राऊत यांनी शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. गेल्या आठवड्यात अंतिम युक्तिवादानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सत्र न्यायालयाने गुरुवारी राऊत यांचे अपील योग्य ठरवले व त्यांची पुराव्यांअभावी बदनामीच्या आरोपांतून निर्दोष सुटका केली.
प्रकरण काय?
मिरा-भाईंदर महापालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामात शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मेधा यांनी राऊतांविरुद्ध मानहानीची तक्रार केली होती. वृत्त वाचून आपल्याला धक्का बसल्याचे आणि राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक असल्याचा दावाही मेधा यांनी केला होता. त्याची दखल घेऊन २६ सप्टेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. मात्र, निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यासाठी राऊत यांना सुनावलेली शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित ठेवून त्यांना जामिनही मंजूर केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.