मराठी भाषा गौरव दिन उत्साहात
जुईनगर, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबई साहित्य परिषद व आप्पा जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम नवी मुंबई प्राथमिक विद्यालय वाशी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नवी मुंबईतील सुमारे दहा शाळांमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ९० विद्यार्थ्यांसह १० शिक्षकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमातील ३२ विद्यार्थ्यांनीही मराठी भाषेबद्दल आत्मीयता व्यक्त करत स्पर्धेत भाग घेतला.
कार्यक्रमाला सतीश सोळाकुरकर, ओमकार मुळे व विशाल सुरावरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ऋतुजा गवस यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर कल्पना देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. सुरावरकर यांनी कविता, अभंग व गझल सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मुळे यांनी डिजिटल पत्रकारिता, मराठी भाषेची वैशिष्ट्ये व भाषाशुद्धीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. सोळाकुरकर यांनी आई व भाकरीवरील कवितांचे गायन सादर केले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी पवळे, दिलीप जांभळे, संतोष जाधव, संतोष मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.