भिवंडी (वार्ताहर) : भिवंडी येथे निवासी इमारतीत सदनिका मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून महिलेची एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पाटील आणि उमेश रोहेकर (दोघे रा. पूर्णा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी आपसात संगनमत करून संजना कापडोसकर (वय ४४) यांना पूर्णा येथील ‘दत्तनगरी रेसिडन्सी’मध्ये सदनिका मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. ६ मार्च २०१८ ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने एक लाख ३० हजार रुपये स्वीकारूनही संबंधितांनी सदनिका उपलब्ध करून दिली नाही. तसेच पैसेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजना यांनी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. अशा प्रकारच्या व्यवहारांमध्ये नागरिकांनी संबंधित कागदपत्रांची खातरजमा करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.