मुंबई

विद्यार्थिनीच्या खात्यात २.६० कोटींचे संशयास्पद व्यवहार

CD

विद्यार्थिनीच्या खात्यात २.६० कोटींचे व्यवहार
मैत्रिणीच्या आग्रहास्तव खाते उघडणे पडले महागात

सकाळ वृत्तसेवा
​डोंबिवली, ता. २६ : बँक खाते उघडण्याचे ‘लक्ष्य’ पूर्ण करण्यासाठी मदत मागणाऱ्या मैत्रिणीवर विश्वास ठेवणे एका विद्यार्थिनीला चांगलेच महागात पडले आहे. डोंबिवलीतील विद्यार्थिनीच्या बँक खात्यात तब्बल दोन कोटी ६० लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या व्यवहारामागे मोठे सायबर रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, याप्रकरणी वारंवार तक्रार करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत विद्यार्थिनीने अखेर मनसेकडे धाव घेतली आहे.

संबंधित विद्यार्थिनी कल्याणमधील एका नामांकित महाविद्यालयात एमएससीचे शिक्षण घेत आहे. तिची एक मैत्रीण बँकेत कार्यरत असल्याचे सांगून, तिने बँकेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी खाते उघडण्याची विनंती केली होती. मैत्रीखातर विद्यार्थिनीने खाते उघडले. मात्र, काही दिवसांतच तिच्या या खात्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले. एका खात्यात २.६० कोटी, तर दुसऱ्या खात्यात सुमारे १० लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हे व्यवहार उत्तराखंडमधील नागरिकांची फसवणूक करून जमा झालेल्या रकमेचे असून, त्यामागे मोठे सायबर रॅकेट असण्याची दाट शक्यता तक्रारदारांनी वर्तवली आहे. रामनगर पोलिसांना याप्रकरणी विचारणा केली असता, विद्यार्थिनीचा अर्ज प्राप्त झाला असून, तांत्रिक तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
​या व्यवहारांबाबत पाठपुरावा करत असताना तपासादरम्यान उल्हासनगर येथील एका व्यक्तीचा या व्यवहारांशी संबंध असल्याचे धागेदोरेही मिळाले आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून रामनगर पोलिस ठाण्यात पाठपुरावा करूनही ठोस कारवाई होत नसल्याने मनसेची मदत मागितली, असे विद्यार्थिनीने सांगितले आहे.

​तपास संशयाच्या भोवऱ्यात
या प्रकरणाची माहिती मिळताच अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘एका सामान्य विद्यार्थिनीच्या खात्याचा वापर करून एवढी मोठी रक्कम फिरवली जाते, हे गंभीर आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हेगारांना अटक करावी, अन्यथा मनसे स्टाइलने जाब विचारला जाईल,’ असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, या प्रकरणात संशयित आरोपीला चौकशीसाठी बोलावूनही पोलिसांनी पुढील कारवाई का केली नाही? उत्तराखंडमधील नागरिकांची फसवणूक होऊन मोठी रक्कम फिरत असताना सायबर सेल आणि स्थानिक पोलिस शांत का आहेत, असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT