मुंबई

शिवाजी पार्कवर मराठी भाषेचा जागर!

CD

शिवाजी पार्कवर मराठी भाषेचा जागर!
मनसेतर्फे अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मुंबईकर वाचकप्रेमींसाठी अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि ‘अभंग रिपोस्ट’ या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष ​राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे आज (ता. २६) विविध वृत्तपत्रांच्या ज्येष्ठ पत्रकारांच्या हस्ते या भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवाजी पार्क मैदानात हा सोहळा रंगणार आहे. हे प्रदर्शन २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्व रसिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात ९२ नामांकित प्रकाशकांची हजारो पुस्तके, कादंबऱ्या, ललित वाङ्‍मय, पौराणिक कथासंग्रह आणि ऐतिहासिक ग्रंथ एकाच छताखाली उपलब्ध आहेत.
​या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे २७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता होणारा ‘अभंग रिपोस्ट’ हा कार्यक्रम असणार आहे. वारकरी संप्रदायातील पारंपरिक संतकाव्य आणि आधुनिक वाद्यसंगीत यांचा सुरेख संगम असलेला हा ‘फ्युजन बँड’ तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. संतांच्या अभंगांना रॉक, सुफी, फोक आणि इंडी फ्युजन शैलीत सादर करून हा बँड आध्यात्मिकतेची आणि आधुनिकतेची सांगड घालतो. त्यांच्या ऊर्जावान सादरीकरणामुळे प्रेक्षकांना एक नवा अनुभव मिळणार आहे.
नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी सांगितले, की अभंगांची समृद्ध परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या बँडचा मुख्य उद्देश आहे. संत साहित्याची गूढता आणि आजच्या काळातील संगीतभाषा यांचा सेतू बांधून परंपरा आणि नवकल्पना यांचा समर्थ संगम यानिमित्ताने साधला जाणार आहे. केवळ गाणी सादर करण्यापुरते मर्यादित न राहता, भक्तीपर परंपरेला नवा आयाम देण्याचा प्रयत्न ‘अभंग रिपोस्ट’च्या माध्यमातून केला जात आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आणि तरुणांनी या प्रदर्शनाला व संगीत सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

SCROLL FOR NEXT