मुंबई

शालेय बस चालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

CD

शालेय बसचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

बदलापूर, ता. २६ (बातमीदार) ः शहरात शालेय बसमध्ये ११ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २६) समोर आली आहे. बुधवारी (ता. २५) सायंकाळी शाळेतून घरी आणताना बसचालकाने मुलीशी अश्लील वार्तालाप करीत तिला अयोग्य स्पर्श केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी आज पहाटे ४ वाजता बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलगी अनुसूचित जातीतील असल्याने या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी कायदाही लावण्यात आला आहे. आरोपी चालक हा वांगणी परिसरात राहणारा असून, बदलापूरमधील एका नामांकित खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसवर तो कार्यरत होता. या बसमध्ये महिला सहकारी नसल्याचेही समोर आले आहे. जानेवारी महिन्यात प्री-स्कूल व्हॅनमध्ये चिमुकल्या मुलीवर अत्याचाराची घटना घडूनही शाळा व्यवस्थापन व प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. शहरात २३ जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर महिनाभराने पुन्हा असाच प्रकार घडल्याने बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

SCROLL FOR NEXT