मुंबई

आदिवासी महिलांचे पाण्यासाठी आंदोलन

CD

आदिवासी महिलांचे पाण्यासाठी आंदोलन

मोखाडा. ता. २७ (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करूनही सरकारकडून पाणी मिळत नसल्याने, सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी वाघ्याची वाडी येथील पाण्याच्या टाकीखाली एकदिवसीय जनआंदोलन केले.
सायदे-जोगलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हट्टीपाडा आणि अंधेरवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने, टॅकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी येथील ग्रामपंचायतीने १६ फेब्रुवारीला तहसीलदार तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकत फिरावे लागले आहे. येथे प्रशासनाने टॅंकरद्वारे पुरवठा केलेला नाही. त्यामुळे आदिवासी महिलांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीखाली आंदोलन केले. आंदोलनास जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता कुणाल पवार सामोरे गेले. त्यांनी संबंधित नळयोजना ३० मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे तसेच आवश्यक तेथे टॅकरद्वारे पाणीपुरवठ्याचे लेखी आश्वासन दिल्याने, येथील आदिवासी महिलांनी आपले आंदोलन मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT