मुंबई

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल !

CD

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. १) तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील वाशी ते कुर्ला अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप-डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
.......
मध्य रेल्वे 
कुठे - सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १०.५५  ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम -
या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या सीएसएमटी  ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांत थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकापासून डाऊन मार्गावर वळवण्यात येतील. तर घाटकोपर येथून  सुटणाऱ्या अप धीम्या सेवा विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.
-------------
हार्बर रेल्वे
कुठे - कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर
कधी - सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम - ब्लॉक कालावधीत  सीएसएमटी येथून पनवेल/ बेलापूर/ वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष उपनगरीय लोकल गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/ नेरूळ स्थानकांदरम्यान  प्रवास करण्याची परवानगी आहे.
.............
पश्चिम रेल्वे
कुठे - चर्चगेट-मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी - सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम -
ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद  मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तर ब्लॉग कालावधीत काही लोकल सेवा रद्द असणार आहे. यामुळे काही उपनगरीय गाड्या  वांद्रे/दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड/रिव्हर्स होतील.
-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT