मुंबई

रुग्णांसाठी रक्तपेढी सुरु नाही

CD

रक्तपेढी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
व्ही. एन. देसाई पालिका रुग्णालयातील नूतनीकरण पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : सांताक्रूझ (पूर्व) येथील व्ही. एन. देसाई पालिका रुग्णालयातील रक्तपेढी जून २०२५ पासून नूतनीकरणाच्या कारणास्तव बंद आहे; मात्र नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊन सुमारे दोन महिने उलटूनही रक्तपेढी सुरू करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, रुग्णांना जवळच्या खासगी रक्तपेढ्यांकडे जावे लागत आहे. नूतनीकरण पूर्ण, यंत्रणा सज्ज, तरीही रक्तपेढीला कुलूप असून उद्घाटनाची प्रतीक्षा रुग्णांच्या जीवावर बेतू नये, अशी मागणी जोर धरत आहे.

रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, नूतनीकरणाची प्रक्रिया अपेक्षेपेक्षा अधिक काळ चालली. काम पूर्ण होऊन यंत्रणा सज्ज आहे; मात्र औपचारिक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत सेवा सुरू होत नाही, अशी चर्चा परिसरात आहे. अधिकृतरीत्या याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर झालेली नाही. रक्तपेढी बंद असल्याने तातडीच्या शस्त्रक्रियांत विलंब, प्रसूती व आपत्कालीन रुग्णांसाठी रक्ताची गरज लागल्यास खासगी रक्तपेढ्यांकडे जावे लागत आहे.

हस्तक्षेप करण्याची मागणी
या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. संबंधित विभागीय लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून याबाबत पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. रक्तपेढीसारखी अत्यावश्यक सेवा प्रशासकीय कारणांमुळे ठप्प राहणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे. यावर बोलण्यास व्ही. एन. देसाई रुग्णालय प्रशासनाशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT