मुंबई

आरोग्य कामगारांचे आंदोलन यशस्वी

CD

पदोन्नतीसाठी प्रशासनाचा हिरवा झेंडा
आंदोलन यशस्वी; म्युनिसिपल मजदूर युनियनचा दावा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : सेवाज्येष्ठता यादीनुसार कनिष्ठ अवेक्षक (जेओ), संनिरीक्षण निरीक्षक व क्षयरोग निरीक्षक पदांवरील रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. महापालिका उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांनी संबंधित प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, आगामी आठवड्यात उपआयुक्त (सामान्य प्रशासन) यांच्यासमवेत बैठक घेऊन पदोन्नती प्रक्रिया मार्गी लावण्याचे मान्य करण्यात आल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनकडून देण्यात आली.

पदोन्नतीसह प्रलंबित प्रश्नांसाठी मुंबई महापालिकेच्या एफ/दक्षिण विभाग कार्यालयासमोर गुरुवारी (ता. २६) सुमारे २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनानंतर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस उपकार्यकारी आरोग्य अधिकारी (मुख्यालय) डॉ. प्रकाश वल्लेपवार, सहप्रमुख कर्मचारी अधिकारी संगीता इरप, प्रशासकीय अधिकारी तारी तसेच युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, सहसरचिटणीस प्रदीप नारकर आदी उपस्थित होते. बैठकीत २०१६च्या सेवाज्येष्ठता यादीनुसार रिक्त जागा भरण्याबाबत चर्चा झाली.

सार्वजनिक आरोग्य खात्यातील पदशृंखला प्रस्तावित असून ती त्वरित मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. स्वच्छता निरीक्षक (एसआय) पदांपैकी ६७ जागा भरल्या असल्या तरी केवळ ५२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश मिळाल्याचा मुद्दा या वेळी मांडण्यात आला. उर्वरित १५ पात्र कर्मचाऱ्यांबाबत पदोन्नती समितीशी चर्चा करून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. सार्वजनिक आरोग्य खात्यातील एकूण ८५९ पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याने कामकाजावर ताण येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणले. पदशृंखला मंजूर झाल्यानंतर कुटुंबकल्याण, माता-बाल संगोपन, संनिरीक्षण व क्षयरोग नियंत्रण विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने राबविली जाईल, असे प्रशासनाने सांगितले. सकारात्मक आश्वासनांमुळे आंदोलन यशस्वी ठरल्याचे युनियनने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT