मुंबई

सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक निकामी; मोठा अनर्थ टळला

CD

रेल्वे मालगाडीचे ब्रेक निकामी
पळसदरी ते कर्जत मोठा अनर्थ टळला; मध्य रेल्वेकडून चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : लोणावळा घाटातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या मालगाडीचे ब्रेक अचानक निकामी झाले. ती उतारावरून वेगाने धावू लागली. पळसदरी ते कर्जत स्थानकादरम्यान काही काळ गाडीवरील लोको पायलटचे नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती; मात्र रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत गाडीला कर्जत स्थानकात सुरक्षितपणे थांबवण्यात यश मिळवले, त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी १२.०१ वाजण्याच्या सुमारास सुमारे ५० डब्यांची सिमेंटने भरलेली मालगाडी लोणावळा स्थानकातून मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. लोणावळा ते कर्जत हा घाटमार्ग उताराचा असल्याने सुरक्षित ब्रेकिंगसाठी या गाडीला अतिरिक्त ‘बँकर’ इंजिन जोडण्यात आले होते. घाट विभागात मालगाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही पद्धत नियमितपणे वापरली जाते; मात्र पळसदरी आणि कर्जत स्थानकांदरम्यान गाडी उतारावरून येत असताना अचानक ब्रेक यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे मालगाडीचा वेग वाढू लागला आणि काही काळ गाडी नियंत्रणाबाहेर गेल्याची स्थिती निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच संबंधित लोको पायलटने तातडीने मध्य रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्वरित परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक हालचाली सुरू केल्या.

मालगाडीला ‘ग्रीन कॉरिडॉर’
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने संबंधित मार्गावरील वाहतूक तात्पुरती नियंत्रित करत मालगाडीला ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून दिला. त्यामुळे गाडीला कोणताही अडथळा न येता कर्जत स्थानकाच्या दिशेने मार्गक्रमण करता आले. दरम्यान, घाटाचा उतार संपल्यानंतर मालगाडीचा वेग हळूहळू कमी झाला आणि ती कर्जत स्थानकातील मिड लाइनवर सुरक्षितपणे थांबवण्यात आली.

सखोल चौकशी सुरू
या घटनेनंतर मालगाडीच्या लोको पायलटचा जबाब नोंदवण्यात आला आहे. ब्रेक यंत्रणा निकामी होण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक तपासणीनंतरच या बिघाडाचे अचूक कारण स्पष्ट होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांची तपासणी आणि सुरक्षा प्रक्रियेचे पुनरावलोकन करण्यात येणार असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : महामार्गावर ट्रॅव्हल अन् ‘ट्रेलर’चा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू, अनेकजण जखमी

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

ठरलं तर मगची घसरण कायम पण तू हि रे माझा मितवाने गड राखला ; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी

Bhiwandi: भिवंडी महापालिकेत बदलींचा धडाका, कामगार संघटनांची तीव्र नाराजी; कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

Jyotiba Temple : २५९ कोटींचा विकास आराखडा; जोतिबा-यमाई मंदिराचा होणार भव्य कायापालट

SCROLL FOR NEXT