पत्नीसमोरच पतीची हत्या
नालासोपारा, ता. २७ (बातमीदार) : वसई-विरार परिसरात गेल्या आठवडाभरापासून हत्यांची मालिका सुरूच असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज पहाटे नालासोपारा पश्चिमेतील हनुमान नगर परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ सोशल मीडियावर ‘डिस्प्ले पिक्चर’ (डीपी) ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून हा रक्तरंजित प्रकार घडला. माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम येथील हनुमान नगरमधील ‘साई निधी अपार्टमेंट’मध्ये ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. इमारतीच्या तळमजल्यावर हसनने आफताबवर चाकूने वार करत त्याची हत्या केली. हा प्रकार आफताबच्या पत्नीसमोरच घडला. डीपीच्या वादातूनच ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.