‘सेल्फी ढाबा’वर गुन्हे शाखेचा छापा
बोळिंज, ता. २७ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ससूनवघर येथील ‘सेल्फी ढाबा लॉजिंग अँड बोर्डिंग’मध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायावर मिरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी सात दलालांना अटक केली असून, १० मुलींची सुटका केली आहे. धक्कादायक म्हणजे, सुटका करण्यात आलेल्यांमध्ये एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. नायगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सेल्फी ढाबा लॉजमध्ये अनैतिक मानवी व्यापार (देहविक्री) सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.