गारगई बोगद्याचे काम वेगात
मुंबई महापालिकेने मागवली निविदा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः गारगई हा पालिकेचा महत्त्वाचा पाणीपुरवठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या दीड किलोमीटरपेक्षा अधिक लांबीच्या बोगद्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी निविदा मागविल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्पी भाषणात दिली.
पालिका निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने गारगई धरणासाठी केंद्र सरकारची मंजुरी घेतली आहे. आता वनीकरणासाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून वेगाने हा प्रकल्प राबविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासाठी पालिका आणि सरकारची लगबग सुरू झाली आहे. मुंबई पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. मुंबईकरांची वाढती तहान भागवण्यासाठी मुंबई महापालिका विविध प्रकल्प राबवण्यासाठी योजना आखत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने २०२० मध्ये गारगई प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तेव्हापासून हा प्रकल्प रेंगाळत आहे. या धरणातून मुंबईची वाढती तहान भागवण्यासाठी दररोज ४४० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.
----
४३७ कोटींची तरतूद
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदा गावाजवळ असलेल्या गारगई नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. या जलाशयातील पाणी आदान मनोऱ्यापासून बोगद्याद्वारे मोडकसागर जलाशयापर्यंत आणण्यासाठी १.६ किमी लांबीच्या बोगद्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या कामासाठी निविदा मागविल्याची माहिती पालिका आयुक्त गगराणी यांनी दिली. या कामासाठी ४३७ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केल्याची माहितीही त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.