मुंबई

भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर

CD

भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर
महिला मोर्चाप्रमुख साधना धुरींचा बविआत प्रवेश
विरार, ता. २८ (बातमीदार) ः वसईतील भाजपच्या महिला मोर्चाचे विधानसभा प्रमुख ॲड. साधना धुरी यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीनंतर बहुजन विकास आघाडीतील पक्षप्रवेशामुळे भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
ॲड. साधना धुरी यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. गेल्या ४० वर्षांपासून भाजपचे काम तळागाळात रुजवले; मात्र ज्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचले, अशा निष्ठावंतांना डावलले आहे. ज्या भागातून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते, तिथे कोणालाही परिचयाच्या नसलेल्या महिलेला तिकीट दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. तसेच भाजपच्या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये रोष असल्याचे सांगितले. या वेळी ॲड. साधना धुरी, चंद्रशेखर धुरी यांच्याकडून हितेंद्र ठाकूर यांनी शहरात केलेल्या कामाची नेहमीच प्रशंसा केली. राजकारण बाजूला ठेवून विधायक कामांसाठी सहकार्य करत असत. ठाकूर यांच्या विचारांनी आणि कार्यपद्धतीने प्रेरित होऊनच बहुजन विकास आघाडीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

घरांच्या किमती वाढण्यात नागपूर आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे, या वर्षात तब्बल 'इतक्या' कोटींच्या उलाढालीची शक्यता

"तर स्थळ आणा.." मुरांबा फेम अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नानंतर मांडलं स्पष्ट मत ; म्हणाली..

Firecracker Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट!, १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Dhule News : धुळ्याच्या औद्योगिक विकासाला सुसाट वेग! 'डी प्लस'पेक्षा अधिकचा दर्जा, गुंतवणुकीवर १५% जादा अनुदान

SCROLL FOR NEXT