मुंबई

मराठी काव्यांची गुरुकुलात मैफील

CD

मराठी काव्यांची गुरुकुलात मैफील
वाणगाव, ता.२८ (बातमीदार): मराठी शाळा हा मराठी भाषेचा कणा असून मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी प्रामुख्याने मराठी शाळा, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. मराठी केवळ भाषा नाही, तर संस्कृती, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. आपल्या मातृभाषेतून विचार व्यक्त करण्याची ताकद, संवेदना आणि आत्मीयता मिळते, असे प्रतिपादन कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी केले.
वि.म.पाटील कृषी प्रतिष्ठान, आसनगाव शिक्षण संकुलातील फार्मसी डिझाईन हॉटेल मॅनेजमेंटला आणि कृषी महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुकुल शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मराठी काव्य वाचन केले. यावेळी शैक्षणिक २०२६-२७ मधील प्रवेश प्रक्रिया माहिती पत्रकांचे वाटप करून प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, वित्त संचालक लूमेश देसाई, कार्यकारी संचालिका तृप्ती पाटील, समन्वय अधिकारी केशव मोहिते, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संकेत धाराशिवकर, फॅशन डिझाईन विभाग प्रमुख प्रा.वैष्णवी करपे, ॲड. विश्वास पांचाळ, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Maratha Reservation: मराठा आंदोलनातील ५६ गुन्हे मागे; राज्य सरकारने पुन्हा मागविली पोलिसांकडून माहिती, जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हालचाली

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहिणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

SCROLL FOR NEXT