मुंबई

‘प्लॅस्टिक मुक्त श्रीवर्धन’ करण्याचे नगरपरिषदेचे आवाहन

CD

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकवर श्रीवर्धनमध्ये बंदी

श्रीवर्धन, ता. २८ (वार्ताहर) : शहरातील पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेच्या दृष्टीने श्रीवर्धन नगर परिषद हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक वस्तूंवर संपूर्ण बंदी प्रभावीपणे लागू करण्यात आली आहे. ही कारवाई केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशांनुसार करण्यात येत आहे.

पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार १ जुलै २०२२ पासून देशभरात १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या काही विशिष्ट एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नगर परिषद हद्दीतील सर्व व्यापारी, विक्रेते, फेरीवाले, हॉटेल, दुकाने व आस्थापनांना बंदी असलेल्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर, साठवणूक, उत्पादन व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. बंदीबाबत जनजागृतीसाठी नगर परिषदेमार्फत सार्वजनिक घोषणा व विविध माध्यमांतून प्रचार-प्रसार सुरू असून, नागरिक व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
कायदेशीर कारवाईची सूचना
प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ (सुधारित २०२१), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ तसेच संबंधित नगरपालिका कायद्यांनुसार बंदी असलेल्या प्लॅस्टिकचा वापर अथवा विक्री आढळल्यास दंडात्मक कारवाई, दंड आकारणी, माल जप्ती व परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
-------------
श्रीवर्धन नगर परिषद प्रशासन पर्यावरण संरक्षणासाठी कटिबद्ध असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर व तत्काळ कारवाई केली जाईल. ‘प्लॅस्टिकमुक्त श्रीवर्धन’ हा संकल्प साकार करण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी व संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT