मानखुर्दच्या इंदिरानगर मार्गावर मातीचे ढिगारे; रहिवासी त्रस्त
चेंबूर, ता. १ (बातमीदार) : मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर परिसरातील इंदिरानगर मार्गावर मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रनगर ते चित्ता कॅम्प या मार्गावर अनधिकृत बांधकामे तसेच खासगी विकासकामे सुरू असून, त्यातील राडारोडा आणि माती रस्त्यावरच टाकून डम्परचालक पलायन करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
कित्येक दिवस हे मातीचे ढिगारे न उचलल्याने वाहतूक कोंडी वाढली असून, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही किरकोळ अपघातांच्या घटनाही घडल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय उडणाऱ्या धुळीमुळे परिसरात प्रदूषण वाढले असून, रहिवासी श्वसनाच्या तक्रारींनी त्रस्त आहेत.
या प्रकाराबाबत स्थानिकांनी पालिका प्रशासनासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र बृहन्मुंबई महापालिकाच्या एम-पूर्व विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच माती टाकणाऱ्या ठेकेदार व डम्परचालकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.