मुंबई

तारापूरचे हरितक्षेत्र संकटात

CD

बोईसर, ता. २८ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक वसाहतीच्या हरित क्षेत्रांमध्ये रासायनिक पाण्याचा साठा झाल्याने ३२ भूखंडांवरील झाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे कारखान्यांमधील सांडपाण्याची गळती थांबवण्याची मोठे आव्हान यंत्रणांसमोर आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक असलेल्या वसाहतीत २,१०० भूखंड आहेत. त्यापैकी १,८०० औद्योगिक तर ३०० निवासी भूखंड आहेत. सध्या १,२०० हून अधिक लघू, मध्यम व मोठे उद्योग तसेच गोदामे कार्यरत आहेत. वाढत्या औद्योगिकीकरणासोबत पर्यावरणीय प्रश्नही अधूनमधून समोर येत आहेत. अशातच काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात केलेल्या वृक्षारोपण केलेल्या हरित क्षेत्रातील परिसरात तलावासारखा पाण्याचा साठा निर्माण झाला आहे. अनेक झाडांची मुळे या दूषित पाण्यात बुडाल्याने काहींची झाडांची खोडे कुजू लागली आहेत. तर तलावातील पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून काही ठिकाणी रंगातही बदल झाल्याने झाडे मरणपंथाला आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
-----------------------
ग्रीन झोनमध्ये रासायनिक पाण्याचा साठा होणे, ही गंभीर बाब आहे. दूषित पाण्यामुळे झाडे वाळण्याच्या स्थितीत असून प्रशासनाने तातडीने तपासणी करून कारवाई करावी.
- रूपेश पाटील, पर्यावरणप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT