मुंबई

मराठी हीच प्रथम भाषा

CD

मराठी हीच प्रथम भाषा

भाईंदर, ता.२८(बातमीदार): इंग्रजी भाषेचे महत्त्व काळानुरूप निश्चितच आहे. मात्र, मराठी मातृभाषा असून तिला प्राथमिकता देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत महापौर डिंपल मेहता यांनी व्यक्त केले.
मिरा-भाईंदर पालिकेच्या वतीने शुक्रवारी (ता.२७) मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पालिकेच्या मुख्य कार्यालयातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन (नगरभवन) पर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. लेझीमच्या तालावर, मराठी भाषा संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन शालेय विद्यार्थी दिंडीत उत्साहाने सहभागी झाले. मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि दैनंदिन व्यवहारात तिचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन महापौर डिंपल मेहता यांनी केले. यानिमित्त लेखिका प्रज्ञा पंडित, प्राध्यापक डॉ. संतोष राणे यांनी मराठी भाषेचा इतिहास, तिची अभिजात परंपरा आणि आधुनिक काळातील उपयुक्ततावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. पालिकेच्या वाचनालयातर्फे ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, आयुक्त राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त डॉ. सचिन बांगर, प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT