मुंबई

मालवणीतील नवीन कलेक्टर कंपाऊंडमध्ये गटाराचे घाण पाणी दारात

CD

गटाराचे घाण पाणी उंबरठ्यावर
मालवणीत रहिवाशांचा संताप ः प्रशासनाकडून दुर्लक्ष
मालाड, ता. २७ (बातमीदार) : मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरातील नवीन कलेक्टर कंपाउंडमध्ये गटारे तुंबल्यामुळे रहिवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गंगाराम रेशन दुकानालगतच्या भागात गटाराचे घाण पाणी थेट लोकांच्या घरांसमोर साचत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून, स्थानिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
मालवणी परिसरातील रस्ता अत्यंत अरुंद असून, नागरिकांना याच मार्गाने ये-जा करावी लागते. शेजारीच खासगी शाळा असल्याने विद्यार्थ्यांना याच घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे. अशातच, या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना जलवाहिनी ठेवण्यात आल्यामुळे नागरिकांना पाइपांवरून तोल सांभाळत चालावे लागत आहे. अनेक वेळा तोल जाऊन लहान मुले पडतात व त्यांचे शालेय गणवेश खराब होतात. पालिका प्रशासनाने आणि स्थानिक नगरसेवकांनी तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन गटारांची साफसफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्थानिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. डेंगी-मलेरियासारख्या आजारांची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. येथून प्रवास करणे म्हणजे घाण पाण्यातून आरोग्यचा धोका पत्करणे. तसेच, या परिसरातून जाताना अनेकदा घाण पाणी अंगावर उडून कपडे खराब होतात, असे रहिवासी नमिता मिश्रा यांनी सांगितले आहे.

प्रशासनाची भूमिका
या गंभीर समस्येबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता, देखभाल खाते कनिष्ठ अधिकारी प्रतीक वाघमारे यांनी सांगितले की, ‘‘सध्या याबाबत माहिती नाही, मात्र लवकरच सविस्तर माहिती घेऊन पुढील आवश्यक कारवाई केली जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT