मराठीतून संस्कृती, परंपरेचा जागर
विक्रमगड येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात
विक्रमगड, ता.२८ (बातमीदार)ः तालुक्यातील विक्रमगड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया वागळे, नाना खरपडे, गोविंद जाबर व दळवी सर यांच्याहस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले.
मराठी भाषेचे वैभव, तिची समृद्ध परंपरा आणि आजच्या पिढीने मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याची गरजेवर उपस्थितांनी भाष्य केले. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून संस्कृती, परंपरा आणि विचारांचा ठेवा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववी तसेच अकरावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मराठी साहित्यातील विविध रचना सादर केल्या. विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज यांच्या गाजलेल्या कविता, मराठी साहित्यातील अभंग, ओव्या, गीते तसेच ‘कणा’ ही प्रेरणादायी कविता प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच कुसुमाग्रज यांच्या साहित्यकृतींचे आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांची माहिती जाणून घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.