मुरबाड, ता. २८ (वार्ताहर) : तालुक्यातील देवगाव केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल अजंठा, वेरूळ आणि पैठण या ऐतिहासिक स्थळी गेली होती. या सहलीदरम्यान पैठण येथील प्रसिद्ध नाथसागर धरणाला भेट देण्यात आली. याच ठिकाणी घडलेल्या एका थरारक प्रसंगात शाळेचे प्राथमिक शिक्षक एकनाथ देसले यांनी प्रसंगावधान राखत बाप-लेकीचे प्राण वाचवले.
सहल पथकात मुख्याध्यापिका दीपश्री इसामे, शिक्षक एकनाथ देसले, शिक्षिका प्रतिमा नागरगोजे आणि श्रद्धा पाटील यांचा समावेश होता. धरणाच्या बांधावर उभे राहून शिक्षक विद्यार्थ्यांना धरणाची रचना व वैशिष्ट्ये समजावून सांगत होते. त्याच वेळी संभाजीनगर येथील वाळुंज परिसरातील शहाणे कुटुंबातील एक व्यक्ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन धरणातील पाणी दाखवत होती. धरणाच्या काठावर शेवाळ साचल्याने दगड निसरडे झाले होते. अचानक त्यांचा पाय घसरला आणि मुलीसह ते मुख्य जलसाठ्यात कोसळले. काही क्षणांतच दोघेही खोल पाण्याकडे ओढले जाऊ लागले. पाण्याची खोली लक्षात घेता कोणीही तत्काळ पुढे सरसावले नाही.
शिक्षक एकनाथ देसले यांच्या नजरेस हा प्रकार पडताच त्यांनी विलंब न करता धाव घेतली. अनेक प्रयत्नानंतर त्यांनी आधी मुलीचा हात घट्ट पकडून तिला वर ओढले आणि त्यानंतर त्या व्यक्तीलाही बाहेर काढण्यात यश मिळवले. वेळीच दाखवलेल्या धाडसामुळे दोन जीव वाचले. प्रसंगावधान, धैर्य आणि तत्परता यांचे उत्तम उदाहरण घालून देणाऱ्या एकनाथ देसले यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.