मुंबई

होळीच्या सणावर महागाईचे सावट

CD

होळीच्या सणावर महागाईचे सावट
बाजारपेठेत पिचकारी, रंगांची दुप्पट भावाने विक्री
विक्रमगड, ता. २८ (बातमीदार)ः तालुक्यातील बाजारपेठा खरेदीसाठी गजबजू लागल्या आहेत. गावखेड्यातील तसेच शहरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने विक्रमगडच्या मुख्य बाजारपेठेत दाखल होत आहेत. मात्र, यंदा होळीला महागाईचा मोठा फटका बसणार असल्याचे चित्र आहे.
पिचकारी, रंग, पावडर तसेच साखरेच्या गाठींसह इतर साहित्यांच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढ झाल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे.
जव्हार, विक्रमगड व मोखाडा दुर्गम आदिवासी तालुके असल्याने येथे रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. अनेक कुटुंबे मजुरीवर उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या खरेदीसाठी अतिरिक्त खर्च करणे सामान्य नागरिकांसाठी अवघड ठरत आहे.
---------------------------
साहित्यांमधील भाववाढ
साहित्य गेल्या वर्षी यंदाचा भाव
पिचकारी ३० ते ४० ५० ते ६०
मास्क २० ते २५ ४० ते ५०
रंग ६० ते ६५ १०० ते १५०
पापड्या २०० ते २५० ३५० ते ४००
-----------------------------
सर्वसामान्यांच्या खिशाला चटका
- मुंबई, पालघर, भिवंडी ठिकाणांहून माल आणावा लागतो. वाहतूक खर्च व इतर खर्चात वाढ झाल्याने किरकोळ भाव वाढवावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भाववाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक जण कमी प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत.
- मुलांसाठी पिचकारी व रंग घेणे भाग असले तरी इतर वस्तूंवर काटकसर केली जात असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. एकूणच, होळीचा उत्साह कायम असला तरी वाढत्या महागाईमुळे यंदाचा सण सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लावणारा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

घरांच्या किमती वाढण्यात नागपूर आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे, या वर्षात तब्बल 'इतक्या' कोटींच्या उलाढालीची शक्यता

"तर स्थळ आणा.." मुरांबा फेम अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नानंतर मांडलं स्पष्ट मत ; म्हणाली..

Firecracker Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट!, १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Dhule News : धुळ्याच्या औद्योगिक विकासाला सुसाट वेग! 'डी प्लस'पेक्षा अधिकचा दर्जा, गुंतवणुकीवर १५% जादा अनुदान

SCROLL FOR NEXT