मुंबई

मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा

CD

मराठी राज्यभाषा दिन उत्साहात साजरा
घाटकोपर, ता. २८ (बातमीदार) ः विवेक विद्यालयात मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध मराठी लेखक व कवी यांचा परिचय करून देत त्यांच्या मराठी भाषेच्या विकासातील योगदानावर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांनी काव्यवाचन, लेखवाचन आदी सादरीकरणांद्वारे मराठी भाषेची समृद्ध परंपरा आणि साहित्यवैभव प्रभावीपणे मांडले. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक विवेक थोरात यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व विशद केले. मराठी ही अभिजात व समृद्ध भाषा असून तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय जोपासावी, शुद्ध लेखन वाचनाचा सराव करावा आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा अभिमानाने वापर करावा, असे त्यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त नियोजनातून साकारलेला हा कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी ठरला. मराठी भाषेप्रती अभिमान, आपुलकी आणि जतनाची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्मरणीय ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT