‘जाणिवेच्या पाऊलखुणा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
मालाड, ता. २८ (बातमीदार) ः अंधेरीतील एस.सी.डी. बर्फीवाला हायस्कुल येथे मराठी भाषा दिनानिमित्त साहित्यिक सोहळा उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधत शाळेचे माजी विद्यार्थी कवी प्रथमेश भोसले (कवी प्रथम) यांच्या ‘जाणिवेच्या पाऊलखुणा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी अलका वालिया व निलेश मेहता यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका डॉ. सुजाता राय आणि उपमुख्याध्यापिका वैष्णवी कुडतरकर यांनी प्रथमेश भोसले यांचे विशेष कौतुक केले. तसेच आयोजक शिक्षकांमध्ये वर्षा उन्हवणे, भाग्यश्री चौधरी, फातिमा शेख, सुभाष वायदंडे, विलास राठोड, प्रमोद निपुर्ते, तारासिंग राठोड, संजय क्षीरसागर, महेश कुवर, सतीश कांबळे आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला.
मराठी भाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणे करून कार्यक्रमात रंगत आणली. साहित्यप्रेम, भाषाभिमान आणि संस्कृतीची जाण विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारा हा उपक्रम ठरला. मराठी भाषा दिनाच्या औचित्याने पार पडलेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.