स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आठवणींना उजाळा
मुलुंड, ता. २८ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वेतील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे गुरुवारी (ता. २६) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने शब्दसुमनांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात त्यांच्या विषयीचे लेख, कविता, अंदमान-निकोबार येथील तुरुंगात भेट दिल्यावरच्या आठवणी सांगून सावरकरप्रेमींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमात कार्यवाह भाग्यश्री नुलकर, महेश कवटकर, युगंधरा वळसंगकर, हेमांगी गायकवाड, लक्ष्मण उपाध्ये, वसंत गोळे आणि रजनी साळुंखे, उल्हास कुळकर्णी, सतीश धोत्रे यांनी सहभाग घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.