मुंबई

मुलुंड मध्ये राजभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

CD

मुलुंडमध्ये राजभाषा गौरव दिन उत्साहात
मुलुंड, ता. २८ (बातमीदार) ः मुलुंडमध्ये मराठी राजभाषा गौरव दिन शुक्रवार (ता. २७) उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुलुंड येथील सार्वजनिक शिक्षण संस्थेच्या भाषा विभागातर्फे मराठी विश्व या नव्या उपक्रमाच्या संस्थापक कार्यकारी मंडळाची पहिली बैठक पार पडली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक देशपांडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. बैठकीत मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीच्या जतन व प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
मराठी साहित्य, कविता आणि ग्रंथांचे पुनर्प्रकाशन, नव्या पुस्तकांचे प्रकाशन आणि १ मे रोजी साजऱ्या होणाऱ्या मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रम निर्णय घेतला. संस्थेचे संस्थापक डॉ. गजानन पुरंदरे आणि नलिनी पुरंदरे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यिक कार्यक्रम घेण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला. बाल साहित्यिकांसाठी कथाकथन व कवितालेखन स्पर्धा, मराठी खाद्यपदार्थ प्रदर्शन, साहित्य संमेलन आणि हास्य कवी संमेलन यांसारखे विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. तसेच मराठी शाळांचे संवर्धन, पालकांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शासन पातळीवर पाठपुरावा करण्यावरही भर देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FD Investment: 10 लाखांची एक FD की 1 लाखाच्या 10 FD? कोणत्या पर्यायात जास्त फायदा आणि सुरक्षितता? सोप्या शब्दांत समजून घ्या

वडील नाही तर 'या' कारणामुळे दिलीप कुमारांनी मोडलं मधुबालाशी ठरलेलं लग्न ; दिग्गज अभिनेत्रीने केली पोलखोल

महायुती सरकारचा मोठा निर्णय! आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्यांची थेट नियुक्ती होणार, समीकरणे बदलणार

Kolhapur Dairy : ३० लाख लिटर दूध देणाऱ्या कोल्हापूरमध्येच पशुवैद्यकीय तुटवडा; १० लाख पशुधनावर आरोग्य संकट

Nashik News : जातीवादी प्रवृत्तींची दहशत मोडीत काढा! शिवरायांचा पुतळा नियोजित जागीच उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT