मुंबई

सिडको गृहनिर्माण योजनेला गुढीपाडव्यापर्यंत मुदतवाढ

CD

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : सिडको महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी गुरुवार (ता. १९)पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

‘माझे पसंतीचे सिडकोचे घर-माझा फर्स्ट चॉइस’ नवी मुंबईमध्ये या योजनेंतर्गत वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी १६,८७६ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उभारण्यात येत असलेल्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग आणि मेट्रोद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. या गृहनिर्माण योजनेकरिता अनामत रक्कमेचा भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख १५ मार्च देण्यात आली असून घर खरेदी करणाऱ्यांना आपले पसंतीचे पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख १९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-US War: ट्रम्प यांचा पुढचा प्लॅन रेडी! इराणवर हल्ला केल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया

Palghar News: उंदरांचे वास्तव्य, सांडपाणी, दुर्गंधी अन्..., तलासरीतील अंगणवाडीला कुलूप; अस्वच्छतेमुळे बालआरोग्यावर प्रश्नचिन्ह

Yeola News : येवल्यात आता प्लास्टिक वापरला तर खिसा रिकामा होणार! नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : स्मार्ट मीटर वादावर तोडगा; वाढीव वीजबिलांसाठी हप्त्यांची सुविधा मंजूर

Ranji Trophy Final: बॅग भर अन् निघ... रात्री ९:३० चा फोन कॉल अन् पठ्ठ्यानं एका रात्रीत फायनल गाठून ठोकलं दीडशतक

SCROLL FOR NEXT