ओढांगी येथे भजनसम्राट दत्तात्रेय बुवा पाटील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन
शिष्यवर्गाच्या पुढाकारातून उभारणार स्मृतिद्वार; वारकरी परंपरेला मानवंदना
पेण, ता. २८ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील ओढांगी येथे वारकरी संप्रदायातील भजनसम्राट ह.भ.प. श्री. दत्तात्रेय बुवा पाटील यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. गावासह परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भजन-कीर्तनाची परंपरा वृद्धिंगत करण्यात बुवा पाटील यांचे मोठे योगदान असून त्यांनी आपल्या सांप्रदायाच्या माध्यमातून अनेक शिष्य घडविले आहेत. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिष्यवर्ग व ग्रामस्थांनी एकत्र येत प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेतला. याचे काम दिपक म्हात्रे स्ट्रक्चरल इंजिनीयर यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली अरविंद पाटील काश्मिरे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
या वेळी वाशी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, खारभूमी विभागाचे निवृत्त अधिकारी अर्जुन कोळी यांच्यासह वाशी, ओढांगी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवेशद्वारासाठी लागणारा संपूर्ण खर्च शिष्यवर्गाकडून करण्यात येणार आहे. भजन-कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य आजही सुरू ठेवणाऱ्या बुवा पाटील यांच्या शिष्यांसाठी हे प्रवेशद्वार प्रेरणास्थान ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.