मुंबई

वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा

CD

वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा
३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

उल्हासनगर, ता. २७ (वार्ताहर) : उल्हासनगर-अंबरनाथ सीमेवरील प्राचीन शिवमंदिर परिसर आणि वालधुनी नदी सुशोभीकरण प्रकल्पामुळे एकतानगर व कैलास कॉलनीत तणाव निर्माण झाला आहे. घाट उभारणीस अडथळा ठरत असल्याचा दावा करत उल्हासनगर महापालिकेने येथील ३० घरांना अवघ्या दोन दिवसांत जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. सुमारे चार दशकांपासून येथे राहणाऱ्या कुटुंबांवर अचानक बेघर होण्याची वेळ आल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण आहे. पुनर्वसनाशिवाय घरे तोडू नयेत, या मागणीवर रहिवासी ठाम आहेत.

उल्हासनगर-अंबरनाथ शहराच्या सीमेवरील प्राचीन शिवमंदिर परिसर आणि वालधुनी नदीचे सुशोभीकरण व घाट निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, या कामासाठी अडथळा ठरत असल्याचे सांगत उल्हासनगर शहरातील एकतानगर आणि कैलास कॉलनी येथील ३० घरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित कुटुंबांना दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रभावित नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांचा सुशोभीकरणाला विरोध नाही; मात्र ते जवळपास ४० वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. दोन दिवसांत घर रिकामे करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक रहिवासी राजेश जाधव यांनी सांगितले की, यापूर्वीही नोटीस देण्यात आली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुनर्वसनाशिवाय कारवाई होणार नसल्याचे आश्वासन दिल्याचा दावा त्यांनी केला. सध्या प्रकरण न्यायालयात असून, पुढील सुनावणी २ मार्च रोजी आहे.
-----------
रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी
दरम्यान, अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांची भेट घेऊन रहिवाशांनी पुनर्वसनाची मागणी केली. नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी तीन वेळा नोटीस दिल्याचे सांगत मुदत संपल्यानंतर पोलिस बंदोबस्तात कारवाईचा इशारा दिला आहे. विकास आणि मानवी संवेदनांचा संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT