चिल्हे मराठी शाळेत ‘आनंद मेळावा’ उत्साहात
खाऊ गल्ली उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे
रोहा, ता. २८ (बातमीदार) : रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद खांब परिसरातील चिल्हे मराठी शाळेत चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय ‘आनंद मेळावा’ उत्साहात पार पडला. शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ‘खाऊ गल्ली’ उभारून छोट्या-छोट्या दुकानांत विविध खाद्यपदार्थांची विक्री केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी खरेदी-विक्री, पैशांची देवाणघेवाण, नफा-तोटा यांसारखे व्यवहारज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून आत्मसात केले.
कार्यक्रमात महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभही आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद पालक, शिक्षक, ग्रामस्थ व महिलांनी घेतला. चिमुकल्यांच्या या कल्पक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.
या वेळी मुख्याध्यापिका सीमा अशोक गायकवाड, शिक्षक शरद पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र महाडिक, उपाध्यक्षा मेघना महाडिक उपस्थित होते. इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांची गणिती क्षमता, बुद्धिमत्ता व आत्मविश्वास वाढल्याचे पालकांनी सांगितले.
फोटो कॅप्शन : खाऊ विक्री करताना विद्यार्थी व पालकवर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.