मुंबई

आगरी-कोळी समाजाचा ‘एक गाव, एक होळी’चा निर्धार

CD

आगरी-कोळी समाजाचा ‘एक गाव, एक होळी’चा निर्धार
नवी मुंबईतील गावांमध्ये सामूहिकतेची परंपरा आजही जिवंत
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : आधुनिकतेच्या वेगात सणांचे स्वरूप बदलत असले तरी नवी मुंबईतील गावांमध्ये आगरी-कोळी समाजाची पारंपरिक होळी आजही पूर्वीइतक्याच उत्साहात साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे. होळीला अवघे काही दिवस शिल्लक असताना गावागावांत “एक गाव, एक होळी”चा नारा देत सामूहिक उत्सवाचे नियोजन केले जात आहे.
‘हावलूबायचा सण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या होलिकोत्सवात नवविवाहित जोडप्याचा जावईबापू म्हणून सन्मान, होळी प्रदक्षिणा, नारळ-ऊस अर्पण, राखेचा टिळा अशा परंपरा जपल्या जातात. काही ठिकाणी सोंग-मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, तर महिलांचे फेर व पारंपरिक गीते यामुळे उत्सवाला सांस्कृतिक रंग चढतो.
कोळी बांधव होड्या-बोटींची पूजा करून उपजीविकेप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. दिवाळे कोळीवाड्याची होळी विशेष आकर्षण ठरते. पाटलांच्या घरातील महिलेला पूजेचा मान देण्याची परंपरा आजही कायम आहे.
चौकट
सामूहिक होळीमुळे जपला जातो गावएकात्मतेचा वारसा
गल्लीनिहाय होळ्यांच्या वाढत्या प्रथेच्या पार्श्वभूमीवर “एक गाव, एक होळी” ही परंपरा कायम ठेवत आगरी-कोळी समाज गावातील एकोप्याचे आणि सामूहिक संस्कृतीचे जतन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT