मुंबई

जुईनगरमध्ये रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी तीव्र

CD

जुईनगरमध्ये रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी तीव्र
अनधिकृत फेरीवाले व अव्यवस्थित पार्किंगमुळे नागरिक त्रस्त
जुईनगर, ता. २८ (बातमीदार) : जुईनगर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सकाळ-सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक व वाहतूक नियोजनाचा अभाव असल्याने वाहनचालकांमध्ये गोंधळ उडतो आणि वाहने एकाच लेनमध्ये अडकून पडतात. जुईनगर बाजारपेठ परिसर, गावदेवी चौक व महापालिका शाळेसमोरील चौकात अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथ व रस्त्याचा काही भाग व्यापल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहने आणि वाढते अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. याचा सर्वाधिक फटका शाळकरी मुले, रुग्णवाहिका व नोकरदार वर्गाला बसत आहे. या समस्येबाबत नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट
फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे कोंडी कायम
रस्त्याच्या कामासोबतच चौकांमध्ये वाढलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे उपलब्ध रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहतूक कोंडीचे मुख्य कारण ठरत आहे. त्यामुळे नियोजनबद्ध कारवाईची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT