होळीला जिलेबी-ठंडाईची गोडवा
ठाण्याच्या बाजारपेठा सज्ज
ठाणे, ता. २८ : होळी आणि धुळवडीचा उत्साह म्हटला की, डोळ्यांसमोर येतात ते उडणारे रंग आणि जिभेवर रेंगाळणारी जिलेबी-ठंडाईची चव. येत्या २ व ३ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणांसाठी ठाण्याच्या बाजारपेठा सजल्या असून, यंदा मिठाई आणि थंडाईवर महागाईचे सावट नसल्याने खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
यंदा केवळ साधी जिलेबीच नव्हे, तर विविध प्रकारच्या मिठाईने ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ठाण्यातील प्रसिद्ध मिठाई विक्रेत्यांकडे विविध गोड पदार्थांना मोठी मागणी आहे. जिलेबीच्या प्रकारात पनीर जिलेबी, केरळ केशरी जिलेबी आणि पारंपरिक पिवळी जिलेबी यांना मागणी आहे, तर थंडाई काजू कतली, थंडाई बर्फीसोबत बत्ताशाच्या माळा, फाफडा आणि विविध प्रकारच्या श्रीखंडालाही मागणी आहे.
थंडाईचा थंड आस्वाद
उत्तर आणि मध्य भारताप्रमाणेच आता ठाण्यातही थंडाईची क्रेझ वाढली आहे. दूध, काजू, बदाम, पिस्ता, मगज, बडीशेप आणि केशर यांपासून तयार केलेली ही पारंपरिक थंडाई लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांची पसंती ठरत आहे. यंदा बाजारपेठेत थंडाई २८० ते ३०० प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
दरांमध्ये स्थिरता
यंदा मिठाई आणि थंडाईच्या दरात फारशी वाढ झालेली नाही. दर स्थिर असल्यामुळे पनीर जिलेबी आणि थंडाई खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे, असे मिठाई व्यावसायिक प्रशांत सकपाळ यांनी सांगितले.
प्रशासनाची करडी नजर
सण उत्साहात साजरा होत असताना कुठेही गालबोट लागू नये आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असेल.
बाजारपेठेतील अंदाजे दरपत्रक
पदार्थ अंदाजे दर
थंडाई २८० - ३०० (लिटर)
पनीर जिलेबी ८०० (किलो)
बत्ताशा माळ २० - ५० (नग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.