जनगणना २०२७ हाऊस लिस्टिंग प्रशिक्षणास सुरुवात
नवी मुंबई महापालिकेत तीन दिवसीय शिबिर; डिजिटल जनगणनेवर भर
वाशी, ता. २८ (बातमीदार) : विकासाची दीर्घकालीन ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी जनगणनेतून मिळणारी माहिती अत्यंत महत्त्वाची असून हे काम अचूक व जबाबदारीने पार पाडावे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा मुख्य जनगणना अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले. जनगणना कार्य निर्देशालय महाराष्ट्र यांच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेतील चार्ज अधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी घरांची यादी (हाऊस लिस्टिंग) तयार करण्याबाबत तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी आयुक्तांनी नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीतील नियोजनबद्ध कामगिरीचा उल्लेख करत जनगणनेतही तितक्याच दर्जेदार कार्याची अपेक्षा व्यक्त केली.
शहर जनगणना अधिकारी तथा उपआयुक्त संजय शिंदे यांनी जनगणनेचे राष्ट्रीय महत्त्व स्पष्ट करत ही पहिली पूर्णतः डिजिटल जनगणना असल्याचे सांगितले. मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन व प्रत्येक पत्त्याचे जिओ-टॅगिंग केले जाणार आहे. प्रशिक्षणात सहाय्यक संचालक तेजल कटारे व सांख्यिकी विधी अधिकारी तुषार पाटील मार्गदर्शन करीत आहेत.
चौकट
पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना
जनगणना २०२७ मध्ये मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन व जिओ-टॅगिंग प्रक्रिया होणार असल्याने अचूक व जलद माहिती उपलब्ध होऊन विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.