होळीपूर्वी तांदळाच्या पापड्या बनवण्याची लगबग
नवी मुंबईतील गावठाणांत परंपरा कायम; उरण-पनवेलमधील महिलांना अल्प रोजगार
तुर्भे, ता. २८ (बातमीदार) : होळीचा सण जवळ येताच नवी मुंबईतील गावठाणांमध्ये तांदळाच्या पापड्या बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. होळी पूजनाच्या पंचनैवेद्यात पापडीला मानाचे स्थान असल्याने आगरी-कोळी समाजात या पदार्थाचे विशेष महत्त्व आहे. शिमगा सणासाठी दहा-बारा दिवस आधीपासून तयारी केली जाते. पूर्वी घराघरांत चुलीवर वाफेवर पापड्या बनवल्या जात असत; आता शहरीकरणामुळे प्रमाण कमी झाले असले तरी नैवेद्यासाठी आवश्यक तेवढ्या पापड्या घरी तयार केल्या जात आहेत. तरुण पिढीही या परंपरेत उत्साहाने सहभागी होत असल्याचे चित्र आहे.
उरण व पनवेल तालुक्यातील गावांमध्ये महिलांकडून पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या पापड्या बेलापूर, नेरूळ, वाशी परिसरात विक्रीस येत असून प्रत्येकी तीन ते पाच रुपयांना विकल्या जातात. त्यामुळे होळीच्या निमित्ताने महिलांना अल्प रोजगार मिळत आहे. वाफेवर बनवलेली पापडी वर्षभर टिकत असल्याने तिची मागणी कायम असते.
चौकट
परंपरेसोबत महिलांना रोजगार
तांदळाच्या पापड्यांच्या विक्रीमुळे उरण-पनवेलमधील महिलांना हंगामी उत्पन्नाचा आधार मिळत असून पारंपरिक कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.