मुंबई

आदिवासी शेतकरी, शेतमजूरांच्या मागण्यांसाठी मोर्चा

CD

आदिवासी शेतकरी, शेतमजुरांच्या मागण्यांसाठी मोर्चा

पालघर, ता. २८ : जव्हार तालुक्यातील आदिवासी, शेतकरी व शेतमजूर यांच्या विविध मागण्यांसाठी जव्हार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे किसान काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
रोजगार हमीच्या नवीन कायद्यामुळे शेतमजूर रोजगारांपासून वंचित राहत आहेत. होळीचा सण आला तरी गेल्या तीन महिन्यांपासून रोजगार हमी अंतर्गत केलेल्या कामाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. हे पैसे मजुरांना न मिळाल्यास होळीचा शिमगा अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करू, असा इशारा मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला. आजही येथील आदिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. यामुळे या समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा लढा हा सुरूच राहील, असे सांगण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष संपत पवार, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील, वरिष्ठ उपाध्यक्ष बळवंत गावित, वरिष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी यांनी केले. या मोर्चात महिला अध्यक्ष पर्वती जाधव, रमेश मुकणे, शैलेश कामडी, संजय बुधर, सुरेश खाडाम, जानू डंबाळी, शिवराम भामरे, अंकुश वळवी, भरत वरठा, सुलभा चौधरी, यमुना किनर, गंगी धोंडगा, वनिता ठाकरे, सुनीता कोकाटे, मती बांबरे, आधी कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------
मोर्चात रोजगार हमीची मजुरी मिळावी, इंदिरा आवास योजनेचे व संजय गांधी निराधार योजनेचे पैसे त्वरित मिळावे, पीडब्ल्यूडी व रोजगार हमीच्या कामातील भ्रष्टाचार दूर करून अधिकारी व ठेकेदारांवर कार्यवाही करावी, जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावू नये, पोलिस पाटील भरती त्वरित व्हावी, जवाहर नगर परिषदेतील गलथान कारभार बंद व्हावा, कृषी खात्यातील लाभाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहोचावे, तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची कामे होत नसल्याबाबत, वन पट्ट्याची प्रकरणे ताबडतोब सोडवणे, जलजीवन पाणीपुरवठा योजनेबाबत, तसेच जव्हार तालुक्यात एमआयडीसी सुरू करण्याबाबत मागण्या करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..!

Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT