मुंबई

कै. गणा चांगू पाटील सार्वजनिक तलाव कचऱ्याच्या विळख्यात

CD

कै. गणा चांगू पाटील सार्वजनिक तलाव कचऱ्याच्या विळख्यात
मोरावे सेक्टर ३ मधील तलावाची दयनीय अवस्था; आरोग्य धोक्यात, तातडीने स्वच्छतेची मागणी
उलवे, ता. २८ (बातमीदार) : उलवे परिसरात वेगाने गगनचुंबी इमारती, रस्ते व आधुनिक सुविधा उभ्या राहत असताना नैसर्गिक जलस्रोत मात्र दुर्लक्षित होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. सेक्टर ३ मधील मोरावे येथे असलेला कै. गणा चांगू पाटील सार्वजनिक तलाव सध्या प्रचंड अस्वच्छतेच्या विळख्यात अडकला आहे.
तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचऱ्याचे ढिगारे साचले असून, पाण्यावर प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल व इतर घनकचरा तरंगताना दिसत आहे. काही ठिकाणी घरगुती सांडपाणी तसेच भांडी धुण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक पाणी थेट तलावात सोडले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. परिणामी तलावाचे पाणी दूषित झाले असून, दुर्गंधी पसरत आहे. तलावाजवळ निवासी इमारती असल्याने डासांची वाढ होऊन डेंगी, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
परिसराच्या सौंदर्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. तलावाची नियमित स्वच्छता होत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ स्वच्छता मोहीम राबवून गाळ काढणे, सुरक्षा कुंपण उभारणे, सूचना फलक लावणे आणि कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

चौकट
कारवाई
तलावाची तत्काळ यंत्रणेमार्फत सर्वंकष स्वच्छता करून साचलेला गाळ काढणे अत्यावश्यक आहे. तलावाभोवती सुरक्षा कुंपण, कचरा टाकण्यास मनाई करणारे फलक आणि नियमित देखरेखीची व्यवस्था केल्यास प्रदूषणावर नियंत्रण मिळू शकते. तसेच तलावात सांडपाणी सोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केल्यास भविष्यातील हानी टाळता येईल. अन्यथा हा तलाव आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांनो सावधान! होळीसाठी झाडे कापलीत तर १ लाखांचा दंड अन् कायदेशीर कारवाई होणार; नेमका कुणी दिला इशारा?

Navi Mumbai: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून ६ शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार, कोणत्या आणि कधीपासून?

Rohit Shetty Shooting : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात खळबळजनक वळण; नेपाळ कनेक्शन उघड

घरांच्या किमती वाढण्यात नागपूर आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे, या वर्षात तब्बल 'इतक्या' कोटींच्या उलाढालीची शक्यता

Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

SCROLL FOR NEXT